By डॉ. सुनील अभिमान अवचार / Dr. Sunil Abhiman Awachar

ती मला भेटली...
राजकुमारांच्या गोड-गुलाबी स्वप्नांतल्या भूलभुलैया बनात.
गंजलेल्या सर्वच गंभीर धर्मग्रंथांच्या पानात.
ती मला येथे भेटते...
ती मला तेथे भेटते...
क्षणासाठी भेटते, हजारो वर्षांपासून भेटते...
ती राहते ऐसपैस
बंगल्यांच्या कॉलनीत.
निमुळत्या रस्त्याच्या
झोपडपट्टीच्या गल्लीत...
ती मला भेटते
पुरुषांच्या जाहिरातीचे मादक पोस्टर न्याहाळत...
लोकल ट्रेन पकडण्यासाठी तगमग करीत...
स्वत:साठी अंतर्वस्त्र पारखून खरेदी करीत...
पोटच्या गोळ्याला दूध पाजताना सहस्रधाराने पाझरत...
तिला ओरबाडलीच कुणाची जहरी नजर तर
"माँ बहन नही है क्या?"
डोळे वटारून शिवी हासडीत...
ती 'या ना रावजी' म्हणून गिऱ्हाईक हेरते...
पिंजऱ्यातील पोपटांना लडिवाळ बोलते..
आवडलेली फुले हुंगते... केसांवर माळते...
पहिल्या पावसात भिजते... जशी लांडोर मोहरते...
तिने मोकळे केस केले तर सूर्यालाही ग्रहण लागते...
तिने एक मिस्कॉल दिला तर काळजाची रिंगटोन वाजते..
गालिबही तिच्यासाठी डुबला आहे प्याल्यात...
कृष्णानेही आळवली आहे बासरीची तान..
तुम्हालाही कसे येईल? तिच्या सुगंधातून भान.
डोंबाच्याच्या खेळात चालते ती तोल सावरीत.
जखमांनी विव्हळणाऱ्या दवाखान्यात
नर्स म्हणून जखमांवर फुंकर घालीत
ती मला भेटते
दयेचा क्रूस पेलीत.
ती मला भेटते
सुकलेल्या ओठांची
करपलेल्या त्वचेची
झिपऱ्या केसांची
मळकट कुबट वासाच्या कपड्यांतील
मनगटाने शेंबूड पुसणारी
माळरानात कापूस वेचणारी
फळे विकणारी/तिफणीमागे चालणारी
खतावरचे कागद घुंडाळणारी
साक्षरतेच्या शाळेत कंदिलाच्या अंधूक उजेडात
मुळाक्षरे गिरवणारी
सोयरिकीसाठी आलेल्या पाहुण्यांपुढे
खालच्या नजरेने पाहणारी
रोजगार हमीच्या यादीतील
एक मजूर...
एक मोलकरीण...
संस्कृतीचा बुरखा घालून
जातिव्यवस्थेच्या जात्यात भरडलेली
ती मला भेटते
सेकण्डहॅण्ड म्हणून
पुरुषसत्तेच्या अजेंड्यावर
एकदा ती मला दिसली
ओबेरॉयमधील प्रसन्न केबिनमध्ये सिगारीचे झुरके घेत
लब्धप्रतिष्ठेची मद्ये चाखत
हायऽ हॅलोऽऽ करीत
रूढ़ी-परंपरांना तुडवत गप्पात बिनधास्त सैल झालेली
हायकोर्टाच्या जस्टिसपुढे आर्ग्यूमेंट करीत
टायटॉनिकमघील केटच्या कातीव देहात
गंभीर चित्रपटांमध्ये वावरणाच्या नंदिता दासच्या डोळ्यांत
मोनालिसाच्या हास्यात,
अजंता चित्रातील काळ्या राणीच्या विरहिणीच्या काळ्या रंगात
तल्लीन कथ्यक नृत्याच्या मुद्रेत
नामदेव ढसाळच्या कवितेत
ती संसदेत पोटतिडकीने प्रश्न मांडते
प्रसंगी अश्रुघूर-लाठीचार्ज झेलते
ती मला दिसते
खांद्यावर झेंडा घेऊन
स्त्रियांच्या सामाजिक आंदोलनांत...
ती म्हणजे काय?
कुंबळेचा आकस्मिक तीनशेवा बळी
ती म्हणजे कुरूपता
अफीम, दारू, धुंकलेला थुका
ब्लॅकहिटलरचं त्वेषाचं काळीज
हजार विचवांचा दंश...
उद्घ्वस्त झुलता पिसा...
ती म्हणजे नितळ स्वच्छ बिसलरीची बाटली
वाळवंटात अरबाचं पाणी शोधणारं काळीज.
सम्राट अशोकाच्या कलिंगच्या युद्धातील
जिवंत उरलेला श्वास...
बुद्धाच्या भिक्षापात्रातील-तळसंदर्भ शोघणारी
यशोघरेची नजर...
पृथ्वीचं सौंदर्य, सत्याचा, मानवतेचा कल्याणाचा गजर...
ती नाही म्हणजे कोणिच नाही
मोराला पाय नाही
धरतीला अंबर नाही
ती नाही, तर
दळताना जात्यावर कोण गाणार ओव्या?
अंगाई रुसणार
मॅग्झिम गाँर्की मदर कशी मांडणार?
सुगरणीलाच फक्त खोपा येतो विणता
रापलेल्या हातांनीच कापता येते रोपाला खाणारे गवत
ती म्हणजे मधाच्या समृद्ध सहस्रधारा
ती म्हणजे खूप काही
तो काही हातात लागत नाही!
(केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ -सुनील अभिमान अवचार ,निर्मिती संवाद प्रकाशन, कोल्हापूर,26 जानेवारी 2016)
डॉ. सुनील अभिमान अवचार हे समकालीन आंबेडकरवादी महत्वाचे कवी-चित्रकार म्हणून परिचित आहेत. मुंबई विद्यापीठ मुंबई मराठी विभागात प्राध्यापक आहेत त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह 'ग्लोबल वर्तमानाच्या कविता' (२००२), 'मी महासत्तेच्यादाराशी कटोरा घेऊन उभा राहणार नाही!' 'ब्राब्हो!फॉक्स माइन्ड्स ऑफ कॅपिटॅलिस्ट्स (२०१०), पोएम ऑफ दी ऑक्युपाय एव्हरीथिंग' (२०१२). केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ'(2016) याच बरोबर इंग्रजी अनुवाद Our WORLD is not for SALE (2010), We, the Rejected People of India(2019) इत्यादी विविध विद्यपीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात त्यांनी शोधनिबंध वाचले आहेत त्यांची कविता आणि चित्राच्या माध्यमातून जात, वर्ग, लिंगभेद, LGBT च्यासाठी महत्वाची भूमिका घेत आहे.नुकताच ते काढत असलेल्या कोरोना कोविड19 च्या लढाईतील चित्र दलित, आदिवासी, भटके विमुक्त स्त्रिया यांचा प्रखर आवाज होत आहेत.
ENGLISH TRANSLATION by Yogesh Maitreya
She meets me…
In the labyrinth orchard of prince’s sweet-pink dream…
In the corrosive pages of imaginary religious books…
She meets me here…
She meets me there…
She meets me for a moment; she has been meeting me for millennia.
She lives spaciously
In the colony of bungalows…
Into the alley of slum
Adjoining to narrow road…
She meets me-
Looking affectionately at intoxicated advertisement of men…
Struggling exhaustingly to catch the local train …
Checking and buying underwear for herself…
Filtering thousands of sprinkles of milk for her child…
If someone’s poisonous eyesight gives her a lecherous look,
‘Bastard, don’t you have mother and sister?’ she says,
Raising her eyes and cursing abuses….
She attracts the customers by saying ‘hey handsome’…
She lures parrots of the cage …
She sniffs the flowers she likes… puts them on her hair
Drenched in the first rain…. blooms as if a peahen…
The sun gets eclipsed if she freed her hair…
If she gives one missed-call…then heart’s ringtone rings…
For her, Ghalib also sunk into pegs, completely…
Krishna also clenched the rhythm of his flute…
How will you regain conscious from her fragrance?
She walks over the rope, balanced and cautiously,break into the play of acrobat…
In the hospital
Where wounds cry loudly
She meets me
While soothing those wounds,
She meets me
While balancing the cross of mercy…
She meets me
Covering the dried lips with cream of motherhood…
Blossoming the greenery over scorched skin
Of scattered hair
Dusky
In the cloths of fetid smell
Wiping mucus with wrist
Plucking the cotton in the field
Selling fruits
Walking behind Tifani
Searching papers into wasteland
Under the dim lamp of ‘literary school’
Drawing alphabets,
Looking at future-in-laws
With shy-eyes,
A labourer
From the employment guarantee scheme….
A housemaid…
Masking the veil of culture
And being crushed into the mixer of caste-system
She meets me-
Over the agenda of men
Being a second-hand:
Once I saw her
Into the lively cabin of Oberoi Hotel
Smoking cigarette
Tasting the honey of borrowed prestige
Doing ‘hi’ and ‘hello’
Treading customs and tradition, being lost in audacious talks
Arguing front of the high-court judge
Into aphrodisiac body of Kate of Titanic,
Into the eyes of Nadita Das
Who moves into the serious cinema,
In the smile of Monalisa,
In the black colour of black-princes
Painted over the grass of Ajanta,
In the absorbed posture of Katthak-dance
In the vibrant poems Namdeo Dhasal
She powerfully poses question into parliament
At time, sustains teargas and baton strokes
I see her
Posing flag over shoulder
In the women’s social movement…..
What does it mean by ‘she’?
She meant ugliness
Opium; liquor, ejected spit, furious heart of black-Hitler:
Sting of thousands scorpions; destroyed, hanging insect
She means smooth bottle of Bisleri…
The heart of an Arab searching for water in desert …
The survived breath, from the battle of King Ashoka’s Kalinga…
The sight of Yashodhara searching of deep meaning
In the begging bowl of the Buddha…
The beauty of the earth, the alarm of truth and welfare of humanity…
There isn’t any if she isn’t there: peacock wouldn’t have legs
Earth wouldn’t have the sky,
Then who will sing a song
While grinding the wheat into mixer?
The lullaby song would be soar
How will Maxim Gorky write ‘Mother’?
Only baya weaver knows to weave the nest
Only laboured hands can cut the grass that destroys the plant…
She means thousand drops of honey
She means so many things-
She cannot be caught by hands…
डॉ. सुनील अभिमान अवचार हे समकालीन आंबेडकरवादी महत्वाचे कवी-चित्रकार म्हणून परिचित आहेत. मुंबई विद्यापीठ मुंबई मराठी विभागात प्राध्यापक आहेत त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह 'ग्लोबल वर्तमानाच्या कविता' (२००२), 'मी महासत्तेच्यादाराशी कटोरा घेऊन उभा राहणार नाही!' 'ब्राब्हो!फॉक्स माइन्ड्स ऑफ कॅपिटॅलिस्ट्स (२०१०),पोएम ऑफ दी ऑक्युपाय एव्हरीथिंग' (२०१२). केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ'(2016) याच बरोबर इंग्रजी अनुवाद Our WORLD is not for SALE (2010), We, the Rejected People of India(2019) इत्यादी विविध विद्यपीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात त्यांनी शोधनिबंध वाचले आहेत त्यांची कविता आणि चित्राच्या माध्यमातून जात, वर्ग, लिंगभेद, LGBT च्यासाठी महत्वाची भूमिका घेत आहे. नुकताच ते काढत असलेल्या कोरोना कोविड19 च्या लढाईतील चित्र दलित, आदिवासी, भटके विमुक्त स्त्रिया यांचा प्रखर आवाज होत आहेत.
Dr. Sunil Abhiman Awachar is an Ambedkarite artist and professor of Marathi literature in Mumbai University.